LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?

रायबाग तालुक्यात सत्यव्वा नावाच्या 78 वर्षीय वृद्ध आईला  पैशांसाठी मुलाने घराबाहेर हाकलून दिल्याची घटना ताजी असतानाच सौंदत्ती तालुक्यात एका मुलाने आपल्या वृद्ध आईला रात्री उशिरा निर्जन भागात सोडून दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

 
मिळालेल्या माहितीनुसार, रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी गावातील रहिवासी कमलम्मा नामक वृद्धा सौंदत्ती तालुक्यातील मुनवळळी गावाच्या बाहेरील भागात असहाय अवस्थेत आढळून आली. त्यांना त्यांच्या मुलाने सोमवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तेथे आणून सोडल्याचा आरोप आहे.
कमलम्मा यांचा मुलगा परिवहन खात्यात कर्मचारी म्हणून सेवा बजावतो असे समजते. 
 आपल्या वृद्ध आईला डोंगराळ आणि निर्जन भागात सोडून मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असला तरी नेमके सत्य काय ? याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.  मुनवळळी पोलीस या प्रकरणाची सत्यासत्यता तपासत असल्याचे समजते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात पहिल्यांदाच सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम सादर करणार थरारक हवाई कसरती मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथखर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक :