LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी छेडण्यात आलेले आंदोलन अखेर घेण्यात आले मागे

सरकारच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांची माघार

news_1779612534_0_761.webp

 

 चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात सिंचन प्रकल्पांच्या  अंमलबजावणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

हुक्केरी तालुक्यात सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी न्यायालय सर्कल परिसरात ठिय्या आंदोलन छेडले होते. शेतकरी नेते चुनप्पा पूजारी आणि शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण हुक्केरी शहर ठप्प झाले होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बंदला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
दरम्यान, शेतकरी नेते शशिकांत गुरुजी यांनी सरकारला इशारा देत उद्या संपूर्ण बेळगाव जिल्हा बंद करण्याचा आणि राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.
जलसंपदा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अमीनभावी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हुक्केरी तालुक्यातील एकत्रित सिंचन प्रकल्पांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून सकारात्मक हमी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले चार दिवसांचे आंदोलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, हे आंदोलन पूर्णपणे मागे घेतले नसून केवळ तात्पुरती माघार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांत सरकारने आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

#farmersstrike
#hukkeristrike

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल