LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भाटी चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत द अगरवाल संघाला विजेतेपद

बेळगाव : युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भाटी चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत द अगरवाल संघाने विजेतेपद पटकाविले तर बालाजी ब्रिगेड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द अगरवाल संघाने मर्यादित दहा षटकात सहा गडी गमावून 121 धावा जमविल्या. त्यांच्या अष्टपैलू सिद्धार्थ भंडारी ने पाच चौकार तीन षटकारसह 56 धावांची खेळी केली. श्वेत याने 13 धावा काढल्या. बालाजी ब्रिगेड तर्फे जे एस पोरवालने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तर दाखल बालाजी ब्रिगेडस संघाने दहा षटकात पाच गडी गमावून 93 धावा काढल्या. अक्षित जैनने तीन चौकार एक षटकार मारून 24 धावा, जनक वैष्णवने 27 तर जेएस पोरवाल 28 धावांची खेळी करून चांगलीच लढत दिली. द अग्रवाल संघातर्फे सिद्धार्थ भंडारी ने तेरा धावात दोन गडी बाद केले तर रोहित पोरवाल, भाविक पुरवाल, विनय खोडा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटी द अगरवाल संघाने 28 धावांनी विजय मिळवून भाटी चॅम्पियन्स लीग आकर्षक चषकावर आपले नाव कोरले.
प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते जितू भाटी, गौरव, सतीश, कुणाल, रवी, अतुल व संजय पुरोहित यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज सिद्धार्थ भंडारी, गोलंदाज- मिठालाल प्रजापत तर मालिकावीराचा पुरस्कार रोहित पोरवाल या खेळाडूंना चषक व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शहजाद पठाण, प्रशांत मुतगेकर तर स्कोरर साईनाथ नाईक, समालोचक अभिषेक असलकर व अनिल कुडतरकर यांनी आपली भूमिका पार पाडली. त्याचबरोबर अनिल गवी व ज्योती पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.


 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती