LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ईडी घेत आहे दुसऱ्या दिवशीही झाडाझडती : पहाटे मारला निवासस्थानी छापा

बेळगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे भावोजी आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी पहाटे छापा टाकला. सकाळी सुमारे 5.30 वाजता सुरू झालेली ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होती.

ईडीचे अधिकारी मंजुनाथ यांच्या घरात ठाण मांडून तपास करत असून त्यांनी अद्याप घराबाहेर पाऊल ठेवलेले नाही. अधिकाऱ्यांसाठी नाश्ता व जेवण घरातच मागविण्यात आले. मंजुनाथ यांची पत्नी आणि कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील एकूण 10 ठिकाणी ईडीने छापे टाकले असून त्यापैकी सहा ठिकाणे बेळगाव जिल्ह्यात आहेत. या कारवाईदरम्यान बेनामी बार परवाने, करारपत्रे, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तसेच सोने-चांदी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी ईडीकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्यात पडून झाली पलटी : दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून बेळगावात साकारले जाणार भव्य हॉकी मैदान :  'हॉकी बेळगाव' संघटनेकडून केले जात आहेत प्रयत्न21 दिवसांत 3.72 कोटी रुपयांचे दान ...! दान म्हणून आलेय 67 ग्रॅम सोने आणि 511 ग्रॅम चांदी ....!!डीआयजी एम. एन. अनुचेत यांनी स्वीकारला वार्ता व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम : सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहनराज्यस्तरीय शेतकरी संघटनांची बैठक पार : वीज महामंडळाच्या खासगीकरण प्रस्तावावर केली गेली चर्चा बेळगावात आधार सेवा केंद्राचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटनकेपीसीसी अध्यक्षांनी मोदी आणि शाहांवर केलाय आरोपांचा भडिमार : म्हणाले, ' राम मंदिर निधी आणि संबंधित व्यवहारांची पारदर्शक चौकशी व्हावी 'ईडी घेत आहे दुसऱ्या दिवशीही झाडाझडती : पहाटे मारला निवासस्थानी छापा' ही कोल्हेकुई वेळीच थांबवा अन्यथा .....'  : येळ्ळूर म.ए. समितीने दिला ईशारा