LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश ..!

निपाणी : 
सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे मिळालेल्या निधीतून निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना दोन सट गणवेशाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 90 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असून शाळेच्या पहिल्या दिवशीच उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा 2026-27 च्या शैक्षणिक सत्राला लवकरच सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुदानीत शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या 15 हजार 884 विद्यार्थ्यांना आणि 16 हजार 396 विद्यार्थिनींना शाळेच्या  गणवेश देण्यात येत आहेत.  पुढील तीन ते चार दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कापड वितरित करण्यात येणार आहे.
शिवणकाम व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचेआव्हान शालेय व्यवस्थापन समित्यांसमोर असणार आहे. 
पूर्वी स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यात अनेक तक्रारी आणि गोंधळ निर्माण झाल्याने दोन वर्षापासून पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांनाच निधी वर्ग करून स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी व शिवून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. समग्र शिक्षा अभियान, पीएम श्री व राज्य गणवेश योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जात आहेत. गणवेश विचारल्यानंतर शाळा सुरू होताच बूट व पायमोजे देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र  तरतूद करण्यात आली आहे.
 शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने शिक्षण विभागाने तयारीला वेग दिला आहे. मात्र, कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता शालेय व्यवस्थापन समित्यांवर येऊन ठेपली आहे.
---
' यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी गणवेशाचा कोटा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना गणवेश वितरण करण्याचे सूचना दिली आहे. त्यानुसार वाटप सुरू असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.'
-महादेवी नाईक,
 गटशिक्षणाधिकारी निपाणी 
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार राजू सेठ यांनी दिली रामतीर्थ नगरला भेट : केला 2.5 कोटी खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभमहिला उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा तर झाली नाही ना ? लक्ष्मी हेब्बाळकरांनी साधली अचूक टायमिंग : मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट चर्चेतआमदार आसिफ सेठ  म्हणाले, नेतृत्व बदलाचा निर्णय हा हायकमांडचा. आम्ही निर्णयाशी बांधील ' पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि दमदार धक्काबुक्की ...' बाँड 'वरील घरांना वीजजोडणी द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगावनगरीत 2 जून पासून  श्री राम कथेचे आयोजनआमदार विश्वास वैद्य म्हणतात, ' नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही '' शिवम ' चा सर्वेसर्वा शिवानंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ..! म्हणाला, ' माझ्या छातीत होताहेत वेदना ' नवतेजचा नवा विश्वविक्रम ..!  वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रमाची नोंददुचाकी चालविताना हातावर चढले नागसापाचे पिल्लू ..!