LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावात दोन दिवशीय राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : बेळगावात दोन दिवशीय राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजिण्यात आली असल्याची माहिती बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी दिली आहे.


ही स्पर्धा 9 मे आणि 10 मे अशी दोन दिवस चालणार असून स्पर्धेत विविध राज्यांतील शेकडो खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्यांना एक लाख रुपयांहून अधिक रोख रकमेची पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार असल्याचेही एस. वाय. प्रभू यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.


खानापूर रोडवरील हॉटेल नेटिव्ह इन येथे ही राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा घेतली जाणार आहे. बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन आणि कर्नाटक राज्य ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत.


स्पर्धेसाठी कर्नाटक ब्रिज असोसिएशन तसेच सिद्धार्थ चंदगडकर, अभिजित भागवत आणि नितीन लोकूर यांनी आपल्या ज्येष्ठांच्या स्मरणार्थ बक्षिसे प्रायोजित केली आहेत, असेही एस. वाय. प्रभू यांनी सांगितले.


यावेळी एस. वाय. प्रभू म्हणाले की, “ब्रिज हा खेळ एकाग्रता, स्मरणशक्ती आणि संघभावना वाढवणारा खेळ आहे. ऑलिम्पिक स्तरावरही या खेळाला मान्यता मिळाली असून, मेंदूसाठी हा उत्तम व्यायाम आहे. वृद्धापकाळात होणारा विस्मरण किंवा अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासही हा खेळ उपयुक्त ठरतो.”
स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


पत्रकार परिषदेला एम. आय. हेगडे, एन. व्ही. देशपांडे, आर. एल. बरवे, संतोष ममदापूर आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती