LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्य

निपाणी : शहर आणि उपनरातील अनेक कुटुंबे घंटागाड्यांना कचरा न देता शेजारच्या गटारात कचरा टाकत आहेत. यामुळे प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्यांचा खच गटारीमध्ये दिसून येत आहेत. प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या आहेत. शहरातील चौकातही कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. 

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची निपाणी नगरपालिकेने  प्रभावी अंमलबजावणीन केल्याने शहरवासीयांनी कचरा वर्गीकरण सक्तीला ठेंगा दाखविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आयुक्तांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तरीही नागरिक, व्यावसायिक आस्थापना आणि मोठे कचरा उत्पादक वर्गीकरण न करताच घंटागाड्यांना कचरा देत आहेत.कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यानंतर पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे सुलभ होऊन कचऱ्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय पर्यावरण संरक्षणास मदत होते. पण शहर आणि उपनरातील अनेक कुटुंबे घंटागाड्यांना कचरा न देता शेजारच्या गटारात कचरा टाकत आहेत. तसेच प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्यांचा खच गटारीमध्ये दिसून येत आहेत.
---
'कचरा वर्गीकरण करून घंटागाड्यांना दिल्यास स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून निर्माण होणारा कचरा चार स्वतंत्र प्रकारांत वर्गीकृत करून घंटागाड्यामध्ये कचरा टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.कचरा एकत्र दिल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.'
-गणपती पाटील, 
नगरपालिका आयुक्त, निपाणी 
----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुख्यमंत्रीपदी  डी. के. शिवकुमार,  कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्यजगातल्या लोकांवर आजही रामकथेची मोहिनी : सच्चिदानंद डॉ.शेवडे'पारस धर्म' संस्कार शिबीर उत्साहात : विद्यार्थ्यांचा शिबिराला मिळाला  उत्स्फूर्त प्रतिसादकौशल्य-आधारित शिक्षण घेणे आज काळाची गरज :  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभेत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले मतशिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान : शिवप्रेमींसाठी एक पर्वणीचडॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदबी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार आसिफ (राजू) सेठ यांची शाळांना भेट आसिफ सेठ म्हणाले, गुणात्मक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण करा '