LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम 

निपाणी :  येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह बीज संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता.यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आज स्कूलच्या आवारात लावली. यामध्ये आंबा,फणस, चिकू याच शिवाय विविध प्रकारच्या औषधी व इतर उपयोगी वनस्पतींचा समावेश करण्यात आला होता.
सध्याच्या ऋतूमध्ये जांभूळ, आंबा, फणस, करवंद अशी विविध फळे उपलब्ध असतात. त्यांचे बीज संवर्धन केले तर ते आपल्याला भविष्यातही आपण झाडे लावण्यासाठी वापरू शकतो. कोणत्याही माळरानावरती आपण या बियांच्या माध्यमातून वृक्षारोपण करू शकतो. याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देतशाळेमध्ये बीज संवर्धनाचा उपक्रमही राबविण्यात आला. 
यावेळी शाळेच्या प्राचार्या चेतना चौगुले यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देत झाडांचे विविध उपयोग, औषधीय वनस्पतींचे महत्त्व, व बीज संवर्धन या विषयांवर सविस्तर माहिती पटवून दिली.  सध्या सुरू असलेले निसर्गाचे असंतुलन आपल्याला पुनर्वत करण्यासाठी झाडेच उपयोगी असल्याचे सांगितले.यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
फ्रिजचा स्फोट होऊन हॉटेलला लागलेल्या आगीत झाले मोठे नुकसानमंत्रीपद न दिल्यास काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा : रेड्डी समाज आक्रमकबालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता नदीवरविजेचा धक्का लागून रंगारी कामगाराचा मृत्यूअंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम नामदेव चौगुले म्हणाले, ' निसर्ग वाचवला तरच भविष्य सुरक्षित राहील ' : कुर्ली हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन कार्यक्रममाजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधनखासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली महाराष्ट्र-कर्नाटक महामार्गाच्या कामाची पाहणी : 2800 कोटी रुपये खर्चातून निर्माण केला जातोय सुमारे 572 किलोमीटर लांबीचा मार्ग' भाविप ' ने   केले होते ' सेवा व संस्कार ' यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन : डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक, स्वाती घोडेकर यांनी केले मार्गदर्शन