LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संस्कार भारतीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम : कलाकारांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

बेळगाव : पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून संस्कार भारती, बेळगाव शाखेच्या वतीने राणी चन्नम्मानगर येथील निवेदार्पण अकॅडेमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात विशेष सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. चंद्रशेखर नवलगुंद यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर राजश्री गुमास्ते यांनी संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.
हुबळीहून आलेले संस्कार भारतीचे कार्यकर्ते श्रीनिवास यांनी अधिक मासाचे धार्मिक महत्त्व, संस्कार भारतीचे विविध उपक्रम आणि संस्थेच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना सहकार्याचे आवाहन केले.
यानंतर राग-रागिणी गानवृंदच्या कलाकारांनी सादर केलेल्या भजन संध्येला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. मराठी व कन्नड भाषेतील 17 हून अधिक भक्तिगीते सादर करत कलाकारांनी तब्बल दीड तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या भजन संध्येत डॉ. गुरुराज मनगुळी, माल्तेश पदकी, अमोल कुलकर्णी, अशोक कट्टी (संवादिनी), विनय पावसकर (तबला), सुनंदा मनगुळी, दीपा पदकी, पूजा कुलकर्णी, वसुंधरा कुलकर्णी, मेधा कुलकर्णी आणि स्नेहा देशपांडे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कार भारतीचे वैभव देशपांडे, गोविंद केळकर, किशोर काकडे, कुलकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती