LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, जी. जी. चिटणीस, बालिका आदर्श अंतिम फेरीत

बेळगांव : गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, जी. जी. चिटणीस, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावरही स्पर्धा घेण्यात आली होती.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जी. जी. चिटणीस शाळेने गोमटेश शाळेचा 6-2 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने प्रेशस ब्लाजम शाळेचा 6-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 4-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्श शाळेने ओरिएंटल शाळेचा 7-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार,प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, स्पर्धा आयोजक सचिव अशोक मुन्नोळी ,जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची , टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी पंच उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, व यश सुतार, हणमंत अडोनी, समीक्षा बुद्रुक, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल