LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

माध्यमिक विभागीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्शची मुसंडी : पटकाविले विजेतेपद

बेळगांव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा , बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत
विजेतेपद पटकाविले
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित या स्पर्धेत वरील दोन्ही गटांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. दोन्ही विजेते संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.


स्पर्धेत मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 8-6 असा पराभव केला तर मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बालिका आदर्श शाळेने संत मीरा शाळेचा 5-4- असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव , स्पर्धा आयोजक सचिव अशोक मुन्नोळी ,जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची , टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी पंच उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, व यश सुतार, हणमंत अडोनी, समीक्षा बुद्रुक, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम