LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सहकाररत्न उत्तम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

निपाणी: कर्नाटक राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.  डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान उत्तम पाटील म्हणाले,डी. के. शिवकुमार साहेब हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांची प्रशासनावरील पकड, निर्णयक्षमता आणि तळागाळातील जनतेशी असलेली नाळ यामुळे कर्नाटकच्या विकासाला नवी दिशा मिळेल. सीमाभागातील मराठी बांधवांच्या अपेक्षाही त्यांच्या नेतृत्वात पूर्ण होतील, असा विश्वास असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिवकुमार यांनीही निपाणी मतदारसंघातील जनतेच्या भावना जाणून घेतल्या व सीमाभागाच्या सर्वांगीण त विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. कर्नाटक राज्य आता विकास, प्रगती आणि जनकल्याणाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, अशी सदिच्छा उत्तम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याला लाभलेले हे दूरदृष्टीचेनेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाची नवी दिशा देणारे व जनतेच्या विश्वासाचा विजय ठरणार असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
या भेटीमुळे सीमाभागातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निपाणी व कर्नाटक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लॉरीच्या धडक बसून झाला  दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!उगारमध्ये 2 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली चालनापर्यावरण संवर्धन ही सातत्याची सवय बनावी : प्रदीपकुमार इंडीमार्केट पोलिसांनी ड्रॅगन चाकू बाळगणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात : मागील आठवड्यात घेतले होते चाकू-मुष्टी बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात..!येळ्ळूर म.ए.समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन बेळगावात झालेल्या योग स्पर्धेत घेतला होता 180 हून अधिक स्पर्धकांनी भागउपस्थिती प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनपावसाने खचलेली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ..!परिवहनला न्यायालयाचा मोठा दणका ..!   केकेआरटीसीची बस करण्यात आली जप्त ..!' आदित्यराज कॅपिटल्स ' मधील मनी लाँड्रिंगप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल