LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

श्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

बेळगाव : बेळगाव शहरातील श्री मारुती नगर दुसरा टप्पा येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, पथदिवे आदी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी श्री मारुती नगर दुसरा टप्पा रहिवासी विकास संघटनेने महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, श्री मारुती नगर दुसरा टप्पा येथे शेकडो कुटुंबे गेल्या सहा ते सात वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, महापालिकेकडून अद्याप कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांचे हाल होत आहेत. त्यामुळे या परिसरात तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकून 24×7 पाणीपुरवठा सुरू करणे, श्री मारुती नगर दुसरा टप्पा परिसराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारे दोन सुसज्ज संपर्क रस्ते उभारणे, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करून डांबरीकरण व दुरुस्ती करणे यांचा समावेश आहे.
तसेच सर्व घरांना सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज) जोडून सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा करावी, रस्ते व चौकांमध्ये वीज खांब व पथदिवे बसवावेत, प्रमुख चौकांमध्ये उच्च क्षमतेचे दिवे लावावेत, दररोज कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्थापन करावे तसेच रस्त्यांच्या बाजूने गटारी बांधाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
शहराच्या बाह्य भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून नियमित कर भरला जात असताना त्यांनाही शासन व महापालिकेकडून मिळणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री मारुती नगर दुसरा टप्पा परिसराचा सर्वांगीण विकास करून येथील नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक निंगप्पा अण्णिगेरी, उपाध्यक्ष रमेश मगदूम तसेच सदस्य अरुण माने, शिवाजी अडिमनी, बसवराज हंडगी, कमलापुरी, किरण अंगडी, प्रकाश शिवयोगी आदी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रममतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅलीविद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासूनशालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे :सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले मतवृक्षारोपणातून दिला सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश : मोहरम, शाहू जयंतीनिमित्त 'भूमी वात्सल्य फाउंडेशन' कडून उपक्रमाचे आयोजन