LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?

फेसबुक वरील मैत्री पडली महागात ....!
 फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली सात लाख पाच हजार रुपयांची टोपी ..!!
ही बातमी BN7 NEWS वर प्रसारित झाली आणि एका सुज्ञ वाचकाने संपादकानाच फोन केला आणि विचारलं, ' ती फॉरेनवाली लक्कापाशी नेमकी  कोणत्या भाषेत बोलली म्हणायचं '. आणि संपादकांचं डोकचं बधीर झालं.

फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तब्बल सात लाख पाच हजार रुपयांची  फसवणूक केल्याचा आरोप करीत लंडनची बेबी रोसांजेल पाझ हिच्याविरोधात यरगट्टी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांने बेळगाव सायबर क्राईम विभागात फिर्याद दाखल केली आहे.
या 53 वर्षीय ग्रामपंचायत अध्यक्षांला फेसबुक खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि ती ग्रामपंचायत अध्यक्ष लक्कापा यांनी स्वीकारली. 
फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण झाली आणि मग खाजगी चॅटिंग सुरू झाले. मी तुझ्या प्रेमात पडल्याचे सांगत तिने विश्वास संपादन केला आणि प्रेमाची भेट म्हणून 80 लाख पाउंड करन्सी म्हणजेच जवळजवळ एक कोटी रुपये तुला पाठवत आहे.  पार्सल द्वारे हा 80 लाख पाउंड रकमेचा धनादेश मी तुला पाठवत आहे. इतकी मोठी रक्कम आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मी तुला पाठवत आहे.  तू त्याचे काय करणार ? अशी विचारणा तिने लक्काप्पाला केली. व्हाट्सअप कॉलवर दोघांचे संभाषण झाले.  या रकमेतून आपण शाळा काढू किंवा गरिबांसाठी घरे बांधू, अशी चर्चा वजा संवाद या दोघांच्यात झाला. यानंतर विमानतळावर चेक क्लिअर व्हायला भारतीय चलनात दोन लाख रुपये कर भरावा लागेल असे सांगत तिने लक्कापा यांच्याकडून दोन लाख रुपये रक्कम लाटली.  यानंतर पुन्हा  आणखी रक्कम भरावी लागणार असल्याचे सांगत टप्प्याटप्प्याने सात लाख पाच हजार रुपये ऑनलाइन च्या माध्यमातून लाटले. 
80 लाख पाउंड करन्सीचा धनादेश आणि लंडनची बेबी रोसांजेल पाझ हिच्या लाघवी बोलण्यात फसलेल्या लक्काप्पाला कालांतराने आपण पुरते फसलो गेलो याची कल्पना आली आणि त्याने सायबर क्राईमचा दरवाजा ठोठावून न्याय मागितला. 

खरी मजा तर इथे आहे....!
लंडनची बेबी रोसांजेल पाझ हिच्याशी लक्कापा यांनी मोबाईलवर चॅटींग केले. तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी केल्या. 80 लाख पाउंड करन्सी पाठविण्याबद्दल आणि ती करन्सी कशी खर्चायची याबद्दल व्हाट्सअप कॉलवर संभाषण केले.  प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.  रोसांजेल पाझ आणि लकाप्पा यांनी हा सारा संवाद,  ही सारी चर्चा नेमकी कोणत्या भाषेत केली असेल बरं. 
यरगट्टी तालुक्यातील कुरूबगट्टीचा लकाप्पा इंग्रजी भाषेत बोलला की लंडनची बेबी रोसांजेल पाझ अस्खलित कन्नड भाषेत बोलली याची माहिती मिळू शकली नाही.  कानडी माणसाच्या बुडाला बुड लावून बसणाऱ्या बेळगावच्या मराठी माणसाला बऱ्यापैकी कन्नड भाषा बोलता येत नाही. तर साता समुद्रापलीकडील लंडनची बेबी रोसांजेल पाझ लक्कापाशी अस्खलित कन्नड भाषेत बोललीच कशी ? की कुरूबगट्टीचा अस्सल कानडी भाषिक लक्कापा रोसांजेल पाझ हिच्यासाठी अस्खलित फॉरेनची भाषा शिकला हे मात्र समजू शकले नाही. याचे स्पष्टीकरणही अद्याप मिळालेले नाही. 

असो, आता तरी सावध व्हा. सायबर गुन्हेगारी वाढते आहे. नाना तऱ्हेचा वापर सायबर गुन्हेगार लोकांना ठकविण्यासाठी करीत आहेत. याबद्दल समाजमाध्यम आणि  प्रसार माध्यमातून वारंवार बातम्या येत आहेत. पोलीस प्रशासनही जीव तोडून आवाहन करीत आहे. इतके करूनही तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या क्लुप्त्याना बळी पडत असाल तर मग ........!!

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलनBN7 NEWS च्या बातमीला मिळाली दाद ....! पालिकेने करून दिली तलावात येणाऱ्या पाण्याला वाट ..!!चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परतनवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली फेसबुकवरील मैत्री पडली महागात :  फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली 7 लाख 5 हजारांची टोपी24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून 765 अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ केपीसीईए-2024 ची तातडीने अंमलबजावणी करा :  नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची सरकारकडे मागणी