LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!

कागवाड: राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले असताना उत्तर कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

 "मंत्रीपद मागून मिळवण्यात अर्थ नाही. पक्षाने संधी दिल्यास मी मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकतो. मला मंत्री होण्याची इच्छा आहे, मात्र ती कोणत्याही प्रकारची लालसा नाही, असे "उगार येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू कागे म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) बैठकीस गैरहजर राहिल्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत  पूर्वसूचना देऊन मी पत्रही दिले होते.
बेंगळूरमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असतानाही आपण मतदारसंघात सक्रिय असून जनतेच्या प्रश्नांवर काम करत असल्याचे कागे यांनी म्हटले आहे.
"मंत्रीपद मिळवण्यासाठी कोणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नाही. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती यशस्वीपणे पार पाडण्याचा मला आत्मविश्वास आहे," असेही ते म्हणाले.
उत्तर कर्नाटकातील वरिष्ठ नेतृत्वाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, असे मत व्यक्त करताना त्यांनी या भागाला योग्य संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसच्या वर्तुळात आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात राजू कागे यांना संधी मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

#rajukage
#kagawad

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलनBN7 NEWS च्या बातमीला मिळाली दाद ....! पालिकेने करून दिली तलावात येणाऱ्या पाण्याला वाट ..!!चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परतनवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली फेसबुकवरील मैत्री पडली महागात :  फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली 7 लाख 5 हजारांची टोपी24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून 765 अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ केपीसीईए-2024 ची तातडीने अंमलबजावणी करा :  नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची सरकारकडे मागणी