LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅली

बेळगाव: जिल्हा स्वीप समितीच्या वतीने मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवारी शहरात विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हा स्वीप समितीचे नोडल अधिकारी रवि बंगारेप्पनवर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, चन्नम्मा चौक आणि क्लब रोड मार्गे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या उपसंचालक कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरावलोकनाबाबत जागृती केली.
या रॅलीत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, बेळगाव विभागाच्या उपसंचालिका श्रीमती लीलावती हिरेमठ, जिल्हा पीयू महाविद्यालयाचे नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, जिल्हा शालेय शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे व्याख्याते एम. एम. मदनबावी, व्याख्यात्या एम. एल. कोरबू यांच्यासह सरदार्स पदवीपुर्व कॉलेज, बेनन स्मिथ शिक्षण प्रशिक्षण केंद्र, संगोळी रायण्णा बी.एड. कॉलेज आणि मन्नूर बी.एड. प्रशिक्षण केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती