LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' बाँड 'वरील घरांना वीजजोडणी द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

बेळगाव : बेळगावातील विविध कॉलनींमध्ये बाँड वर खरेदी केलेल्या जमिनीवर  घरे बांधून राहणाऱ्या गरीब कुटुंबांना तातडीने वीज मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करत आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन धाडण्यात आले.
बाँड वर खरेदी केलेल्या जमिनीवर  घरे बांधून  वीज नसल्याने अंधारात हालअपेष्टा सहन करणाऱ्या शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून संताप व्यक्त केला.
बाँडवर खरेदी केलेल्या जमिनीवर घरे बांधलेल्या नागरिकांना वीजजोडणी द्यावी, या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.

बेळगावातील अमन नगर, उज्वल नगर, समर्थ नगर आणि वैभव नगर येथील झटपट कॉलनीसह अनेक कॉलनीमध्ये अनेक गरीब कुटुंबे  बाँडवरील जमिनीवर घरे बांधून वास्तव्य करीत आहेत.  मात्र, त्यांना वीज मीटर न दिल्याने  मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
मागील हिवाळी अधिवेशनावेळी मंत्र्यांना आणि आमदारांना निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. बाँडधारक आणि बी-खाता धारकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बेंगळूरसाठी एक धोरण आणि बेळगावासाठी दुसरे धोरण अवलंबले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गरीब नागरिकांना तातडीने वीज मीटर उपलब्ध करून द्यावेत. येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारने याबाबत घोषणा करावी,” अशी मागणी अंजुमन संस्थेचे उत्तर कर्नाटक प्रमुख जावीद नेगिनहाळ यांनी केली.
गरीब नागरिकांनी बाँडच्या आधारे जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. मात्र, अनेक घरांना वीजजोडणी नसल्याने नागरिकांना दिवे लावून जुन्या पद्धतीने जीवन जगावे लागत आहे. तसेच व्यवसाय आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या घरांना तातडीने वीजजोडणी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.


“ गेल्या एका वर्षापासून आम्ही ही समस्या सहन करत आहोत. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन करून निवेदन दिले, तरी सरकारने याकडे लक्ष दिले नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यावा, ” अशी मागणी अंजुमन उत्तर कर्नाटकचे कार्यकारी सचिव अब्दुल वाहीद अत्तार यांनी केली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार राजू सेठ यांनी दिली रामतीर्थ नगरला भेट : केला 2.5 कोटी खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभमहिला उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा तर झाली नाही ना ? लक्ष्मी हेब्बाळकरांनी साधली अचूक टायमिंग : मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट चर्चेतआमदार आसिफ सेठ  म्हणाले, नेतृत्व बदलाचा निर्णय हा हायकमांडचा. आम्ही निर्णयाशी बांधील ' पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि दमदार धक्काबुक्की ...' बाँड 'वरील घरांना वीजजोडणी द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगावनगरीत 2 जून पासून  श्री राम कथेचे आयोजनआमदार विश्वास वैद्य म्हणतात, ' नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही '' शिवम ' चा सर्वेसर्वा शिवानंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ..! म्हणाला, ' माझ्या छातीत होताहेत वेदना ' नवतेजचा नवा विश्वविक्रम ..!  वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रमाची नोंददुचाकी चालविताना हातावर चढले नागसापाचे पिल्लू ..!