LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात

ज्योती चिंडक म्हणाल्या, ' खेळामध्ये जग जिंकण्याची ताकद '

 बेळगाव : खेळामध्ये जग जिंकण्याची ताकद असल्याचे शिवगंगा स्केटिंग क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती चिंडक म्हणाल्या. 

जिल्हास्तरीय तसेच क्लब पातळीवर झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच खासबाग-बेळगाव येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर पार पडला. या समारंभात ज्योती चिंडक यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. 
 स्केट पार्कचे अध्यक्ष अशोक गोरे यावेळी उपस्थित होते.  यांच्या शुभ हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
 यावेळी बोलताना सौ. ज्योती चिंडक यांनी स्केटिंगपटूंना स्केटिंग खेळाविषयी विषयी व आरोग्या विषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 अशोक गोरे यांनी, बेळगांवमधील स्केटिंगपटूंना खेळाबाबत सर्वत्तोपरी मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी पालक व स्केटिंगपटूंना शिस्त व खेळाबदल मार्गदर्शन केले.
 या बक्षीस समारंभाला आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू निखिल चिंडक, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, ऋषिकेश पसारे,  रोकडे,  महात, कृष्णकन्हैया होसमनी, विनायक पाटील यासह बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंगपटू व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

#sketting #PrizeDistributionCeremony  #jyotichindak  #surykanthindalgekar

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST