LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

निपाणी नगरपालिकेवरील नियोजित मोर्चा स्थगित ..!

निपाणी : लोक मागणीनुसार पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा केल्याने  निपाणी नगरपालिकेवर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

निपाणी शहरातील मुगळे गल्ली, तवटे गल्ली आणि शानेदिवाण गल्ली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी सभापती जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. तात्काळ त्याचे दखल न घेतल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आयुक्त गणपती पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे नगरपालिकेवर मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती जुबेर बागवान यांनी दिली

मुगळे गल्ली, तवटे गल्ली मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. त्याची दखल घेऊन बागवान यांच्या नेतृत्वाखाली निपाणी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते आणि मोर्चाचा ईशारा देण्यात आला होता.  आनंद सोलापूरकर -सरकार यांना त्यांच्या जागेतून पाईपलाईन घालण्याची विनंती केली होती. त्यांनी परवानगी दिल्याने दुरुस्तीसह पाईपलाईन घालण्याचे काम झाले आहे. यामुळे नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे. 
तात्काळ दुरुस्ती झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. आता मिळणारे पाणी सुरळीत पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, पाणीपुरवठा विभागाचे इन्चार्ज प्रवीण कनगले, अभियंते पठाण व कर्मचारी उपस्थित होते. 
----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम