LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिद्दीने केली परिस्थितीवर मात : बैलगाडीवानाचा मुलगा बनला 'अग्निवीर' 

निपाणी : व्यक्तीकडे योग्य ध्येय आणि ते ध्येयपूर्तीसाठी अफाट जिद्द असली की ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत यशोशिखर गाठू शकते, हे निपाणीतील एका बैलगाडीवानाच्या मुलाने सिद्ध करून दाखविले आहे. 

बेताच्या आर्थिक परिस्थितीत बैलजोडीचे संगोपन करीत बैलगाडी हाकत संसाराचा गाडा ओढणाऱ्या येथील बैलगाडीवानाच्या मुलाने कठिण अग्निवीर परीक्षा पार करत भारतीय सेनेत आपले स्थान भक्कम केले आहे. येथील भीमनगर वसाहतीतील संदीप कांबळे या बैलगाडीवानाचा मुलगा प्रथमेश संदीप कांबळे असे या युवकाचे नाव आहे. तो निपाणी ते येताच बैलगाडीतून त्याची मिरवणूक काढण्यात आली.
 भारतीय सेनेत सेवा बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून प्रथमेश परिश्रम करीत होता. यासाठी अनेकवेळा भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. रायचूर येथे झालेल्या महार रजिमेंट सागर (मध्य प्रदेश) मध्ये झालेल्या निवड प्रक्रियेतील कसोट्यांवर प्रथमेश उत्तीर्ण झाला. त्याची निवड होऊन प्रशिक्षण झाल्यानंतर कारकिर्दीला सुरवात ठरणारी भारतीय सेनेची कसम परेडही त्याने पूर्ण केली आहे. सध्या तो दिल्ली येथे सेवा बजावणार आहे.
 भारतीय सेनेत यशस्वीपणे प्रवेश मिळवित अग्निवीर बनलेल्या प्रथमेश याचे निपाणीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्याची गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक थळोबा पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भिमनगर अशी काढण्यात - आली. दरम्यान, निपाणीकरांनी ही त्याचे भरभरून कौतुक केले. शिवाय मिरवणुकीच्या मार्गावर त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तरूणांनी व्यसनांच्या आहारी न जाता देशाच्या सेवेसाठी पुढे आले पाहिजे. सैन्य क्षेत्रातही उज्वल भविष्य घडविता येते. प्रत्येकाने सैन्यात भरती होण्याचे ध्येय ठेवून कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल