LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

बेळगाव : विजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. आज, शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी बंबर्गे येथे ही घटना घडली. अमोल विवेकानंद जाधव उर्फ ​​‘लालू’ (वय 43,
राहणार-रामनगर, कंग्राळी खुर्द, बेळगाव) येथे ही घटना घडली.


अमोल विवेकानंद जाधव या तरुणाचा बंबर्गे गावात पोल्ट्री फार्म आहे. तो पत्नीसमवेत पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी गेला होता. दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. यावेळी पाण्याची मोटार सुरू करताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. त्यावेळी काही अंतरावर उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीने ही घटना पाहिली आणि तिने आरडाओरडा केला. यावेळी आसपासचे लोक जमा झाले. मात्र, तोपर्यंत अमोल संपला होता. नातेवाईकांना फोनवरून घटनेची माहिती देण्यात आली.
शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा इस्पितळात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल