LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नेसरीकर प्लॉट रेणुका मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणीचा शुभारंभ

निपाणी : 
निपाणी येथील नेसरीकर प्लॉटमधील रेणुका मंदिर परिसरा नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी 'ऑक्सिजन पार्क ' निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. 


भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. 

पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, परिसरात वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक भागात ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावे, या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या प्रिय व्यक्तींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस तसेच स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करून लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करूया. प्रत्येक परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.याशिवाय  चौगुले यांनी 10 ते 11 फूट उंचीची वृक्षरोपे भेट देऊन उपक्रमाला हातभार लावला.
माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांनी, पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी मोठ्या उंचीची वृक्षरोपे देऊन बगीचा निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून या परिसरात आदर्श उद्यान उभारण्याचा प्रयत्न यशस्वी होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास जेम्स सत्तेगिरी, भगवंत कुरणे, रफिक शेख, मन्सूर मुल्ला, राजू चौगुले, राजू जत्राटे, निर्मला जाधव, शोभा जत्राटे, ललिता हनिमनाळे, संजय सोनटक्के, कृष्णात कांबळे, श्रावण कांबळे, आरती कांबळे, राणी देवरमणी, पूनम देवरमणी आदी उपस्थित होते. राजेंद्र शेटके यांनी आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
डंपरची दुचाकीला धडक :  अपघातात  युवक ठार : दोघे गंभीर राज्य नेतृत्वाचा तिढा सुटण्याची शक्यता : सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय विश्वास' शिवम ' मध्ये माजी सैनिकांची गुंतवणूक...!वाह रे शिवम ....! यारदू रोक्क यल्लमन जात्री ..!! शिवम असोशिएट्स घोटाळा प्रकरणी अभिलाष यांची सीआयडी चौकशीए टू चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ : एसकेई संघाची विजयी सलामीकायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करा जमीन वादातून गोळीबार : पायाला गोळी लागून युवक जखमीउपजिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी निवडवाटाळांच्या नाट्याचा पहिला अंक संपला : प्रसिद्धी मिळाली, नागराज खूष ..!!अपघातात युवकाचा मृत्यू