LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नारी शक्ती आक्रमक : केली सी. टी. रवींच्या राजीनाम्याची मागणी : छेडले चन्नम्मा चौकात आंदोलन

बेळगाव : राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल वापरलेले अश्लील शब्द विधान परिषद आमदार सी. टी. रवी यांना चांगलेच भोवले आहेत.
आमदार पदावरून त्यांची हकालपट्टी होईतोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. या मागणीसाठी नारी शक्तीही आज आक्रमक झाली.


सी. टी. रवी यांच्याविरोधात लक्ष्मी हेब्बाळकर समर्थक उग्र झाले असून राज्यपालांनी रवी यांचा राजीनामा घेईतोपर्यंत विविधमार्गे आंदोलन सुरू ठेवले जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.



आज बेळगाव ग्रामीण मतदार संघातील हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी राणी चन्नम्मा सर्कल येथे उग्र आंदोलन छेडले. यानंतर सी. टी. रवी यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची तिरडीवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. चिडलेल्या महिलावर्गांने आमदार रवी यांच्या छायाचित्राला चपलेने मारून आपला संताप व्यक्त केला. भर चौकात त्यांच्या प्रतिकृतीचे दहन करून रवी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदार व राज्याच्या मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लील शब्द उच्चारून आमदार सी. टी. रवी यांनी संपूर्ण महिलावर्गाचा अपमान केला आहे. त्यांना प्रायश्चित दिले जावे, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.


सी. टी. रवी यांची आमदार पदावरून त्यांची हकालपट्टी करावी, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन सदर मागणीचे निवेदन सादर केले.
बहुसंख्येने जमलेल्या या समर्थकांनी हातात निषेधाचे फलक आणि बॅनर घेऊन आमदार रवी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत त्यांचा धिक्कार केला.
आंदोलनामध्ये महिला समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती