LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भाग

बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावटीने ओमनगर-खासबाग येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग ट्रॅक वर आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.या स्पर्धेत सुमारे 150 हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते.


या स्पर्धेचे उद्घघाटन शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक व समाजसेवक अशोक गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध भागातून आलेले स्केटिंग पटू व पालक उपस्थित होते.


स्पर्धेत 6 वर्षाखालील मुलांच्या विभागात मारीने 3 सुवर्ण, केदारने 3 रौप्यपदके मिळविली.
6 वर्षाखालील मुलींच्या विभागात आध्या उप्पारने 2 सुवर्ण, 1 कांस्य, सौम्याने 2 रौप्य,1 सुवर्ण तर अंजली हिने 3 कांस्य तसेच 6 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांच्या विभागात ईशान प्रभाकरने 3 सुवर्ण, पियूषने 1 रौप्य, 2 कांस्य, तन्मयने 2 रौप्य व 1 कांस्य तर 6 ते 8 वर्ष वयोगटात मुलींच्या विभागात
प्रणिता मोटेकर हिने 3 सुवर्ण, रीवा नाईकने 2 रौप्य, 1कांस्य तर धृती हिने 1 रौप्य,2 कांस्यपदके पटकाविली.
8 ते 10 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात दियान पोरवालने 3 सुवर्ण, प्रीतम बागेवाडी याने 3 रौप्य तर
याच वयोगटात मुलींचे विभागात अलिजाने 3 सुवर्ण, अद्या हिने 3 रौप्य तर स्वराली हिने 3 कांस्यपदके मिळविली.
10 ते 12 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात आर्यन गवंडीने 3 सुवर्ण, राजवीर कदम याने 3 रौप्य, अर्षमानने 2 रौप्य
तर याच वयोगटात मुलींच्या विभागात दुर्वा पाटील हिने 3 सुवर्ण, अँजेलाने 3 रौप्य तर युक्ता हिने 3 कांस्यपदके मिळविली.
12 ते 15 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात सर्वेश पाटीलने 1 सुवर्ण, 3 रौप्य, कुलदीप बिर्जे याने 2 सुवर्ण, 1 रौप्य तर सूफीयांन याने 3 कांस्यपदके तसेच
याच वयोगटात मुलींच्या विभागात प्रांजल पाटीलने 3 सुवर्ण, अनन्या हिने 1 रौप्य, 2 कांस्य, इलोराने 1कांस्य, 2 रौप्यपदके मिळविली.
15 ते 18 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात
अचकितने 3 सुवर्ण, विवेकने 3 रौप्य, प्रज्वलने 3 कांस्यपदके तसेच याच वयोगटात मुलींच्या विभागात
जान्हवी तेंडूलकर हिने 3 सुवर्णपदके मिळविली.


ईनलाईन स्पर्धेत 6 वर्षाखालील मुलांच्या विभागात
मनवीतने 3 सुवर्ण, 6 ते 8 वर्ष वयोगटात मुलांचे विभागात एडविनने 2 सुवर्ण,1 रौप्य, अंशराज याने 1 सुवर्ण,2 रौप्य,
तर मुलींच्या विभागात अदितीने 3 सुवर्ण तर साबिया हिने 3 रौप्य पदके मिळविली. 8 ते 10 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात सामांगने 3 सुवर्ण, अविनाश पाटील याने 3 रौप्य, आयुषने 3 कांस्य तर 10 ते 12 वर्ष वयोगटात मुलींच्या विभागात अबिरेलने 3 सुवर्ण,अमिषा वेर्णेकर हिने 3 रौप्य आणि राही जितकर हिने 3 कांस्यपदके मिळविली.
12 ते 15 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात आरशान माडीवाले याने 13 सुवर्ण तर मुलींची विभागात जोएने 3 सुवर्ण, अबेकाने 3 रौप्यपदके तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटात मुलांच्या विभागात शल्य तरळेकर याने 3 सुवर्ण तर
श्रेयश वजंत्री याने 3 रौप्यपदके पटकाविली.


विजेत्या स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, ऋषिकेश पसारे, विशाल वेसणे, सतीश शेटे, विनायक पाटील, सोहम हिंडलगेकर यांनी परिश्रम घेतले.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम