LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आमदार विश्वास वैद्य म्हणतात, ' नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही '

बेळगाव : नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे आमदार विश्वास वैद्य यांनी म्हटले आहे. 

राज्यात नेतृत्व बदलाचे वारे जोराने वाहत असून मुख्यमंत्री बदलाबद्दल राजकीय वर्तुळात चवीने चर्चा सुरू आहे. मात्र,  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नाश्ता बैठकीबाबत किंवा बदलाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे आमदार यांनी स्पष्ट केले आहे. 
यल्लम्मा प्राधिकरणाच्या बैठकीनिमित्त आपण सध्या बेळगावात असल्याने नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काही माहित नाही, असे त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना विश्वास वैद्य म्हणाले की, “सीएलपी बैठकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. सतीश जारकीहोळी यांना केपीसीसी अध्यक्षपद दिल्यास ते उत्तम काम करतील आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मदत करतील. उद्या पक्षाकडून संदेश आला तर मी बैठकीला जाईन.”
तसेच, “मला मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही. चार-पाच महिन्यांपूर्वी बेंगळूरमध्ये दोन वेळा निवडून आलेल्या आमदारांसह तब्बल 65 आमदारांची बैठक झाली होती. 136 आमदारांपैकी सुमारे 40 टक्के आमदार प्रथमच निवडून आले आहेत. आम्हालाही संधी द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपद तसेच केपीसीसी अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय हा पक्षाच्या हायकमांडकडे असल्याचेही विश्वास वैद्य यांनी नमूद केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल