LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आमदार अरविंद बेल्लद म्हणतात,'  खर्गे यांनी आता स्टंटबाजीचे राजकारण सोडून द्यावे '

धारवाड : आरएसएसच्या नोंदणीच्या मुद्द्यावर मंत्री प्रियांक खर्गे यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहिल्यानंतर भाजप आमदार अरविंद बेल्लद यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

धारवाड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद बेल्लद म्हणाले की, “प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आहेत. कमी वयात त्यांना मंत्रीपद मिळाले असून ते काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून पुढे आले आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्धीसाठी छोटे-छोटे स्टंट करण्याची त्यांना गरज नाही. देशभरात त्यांची ओळख आहे. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करणे योग्य नाही.”
ते पुढे म्हणाले, “प्रथम त्यांनी आपल्या खात्यात चांगले काम करून नाव कमवावे. राज्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. गावोगावी मद्यपानाचे दुष्परिणाम दिसत आहेत. बेकायदेशीर सट्टेबाजी, जुगार आणि शस्त्रांचा गैरवापर वाढला आहे. या गोष्टींवर नियंत्रण आणणे ही सरकारची जबाबदारी आहे. घरातील विझलेला दिवा पेटवण्याचे काम त्यांनी करावे. त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, त्यामुळे अशा स्टंटबाजीपासून त्यांनी दूरच राहावे,” असा सल्लाही अरविंद बेल्लद यांनी प्रियांका खर्गे यांना दिला.

राज्य सरकारच्या हमी योजनांसाठी पुन्हा अर्ज मागवण्याच्या निर्णयावरही बेल्लद यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “हे सरकार आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारची आर्थिक स्थिती बिघडवली असून आता डी. के. शिवकुमार यांच्यावर सरकार चालवण्याची वेळ आली आहे. योजनांचा खर्च कमी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनाच वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
“चार-चार महिने लाभ न देता पुन्हा अर्ज मागवले जात आहेत. योग्य कागदपत्रे सादर केलेल्या लाभार्थ्यांनाही अपात्र ठरवले जात आहे. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. सरकारला अजून दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. सर्वसामान्य जनता हे सर्व पाहत असून योग्य वेळी योग्य उत्तर देईल,” असेही त्यांनी म्हटले.

बिदादी येथे प्रस्तावित टाउनशिपच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अरविंद बेल्लद म्हणाले, “बेंगळूरच्या आसपास उपग्रह (सॅटेलाइट) टाउनशिपची नक्कीच गरज आहे. लोकांनी ज्या ठिकाणी काम करावे, त्याच ठिकाणी राहण्याची सोय असावी. त्यामुळे रोजगार आणि विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील.”
मात्र, यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करण्यास ते विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काँग्रेसने आधीच भरपूर पैसा कमावला आहे. शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेऊन अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची आमची इच्छा नाही,” असे बेल्लद यांनी म्हटले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल