LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मंत्री सतीश जारकीहोळी यांची लोकअदालत : ऐकल्या लोकांच्या तक्रारी

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी  यांनी शहरातील काँग्रेस कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या  ऐकून घेतल्या. तसेच विविध विभागांशी संबंधित प्रश्नांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, मूलभूत सुविधा तसेच इतर सार्वजनिक प्रश्नांबाबत निवेदने सादर केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही मंत्री जारकीहोळी यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा, महसूल विभाग तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित विविध समस्यांबाबत त्यांनी निवेदने दिली.
प्रत्येक तक्रार काळजीपूर्वक ऐकून घेत मंत्री जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्राधान्यक्रमाने समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली.
बैठकीत पक्षाच्या उपक्रमांबाबत, आगामी कार्यक्रमांबाबत तसेच मतदारसंघातील विकासकामांबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेत मंत्री जारकीहोळी यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ (Asif Sait ) उपस्थित होते.

#satishjarakiholi 
#mlaAsifSait
#CongressOffice 
#PWDMinister

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल