LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव डीसी कार्यालयाच्या नूतनीकरण कामांची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली पाहणी

बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या नूतनीकरण तसेच विविध विकासकामांची सार्वजनिक बांधकाम मंत्री सतिश जारकीहोळी (Satish Jarkiholi ) यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

कार्यालय परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यास सरकारने प्राधान्य दिले असून, सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण Supefitendentofpकरण्याच्या सूचना मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सुसज्ज रस्ते व प्रशस्त पार्किंग व्यवस्था
जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असल्याने त्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी संपूर्ण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. कार्यालयाच्या आवारात सुसज्ज रस्त्यांची उभारणी तसेच नागरिकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन ( Mohammed Roshan) यांनी नकाशाच्या माध्यमातून मंत्र्यांना दिली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे (Rahul Shinde), जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन (K. Ramarajan) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#SatishJarkiholi #DCOffice 
#MohammedRoshan
#RahulShinde
#KRamarajan
#PwdMinister 
#DistrictCollector 
#zpceo 
#sp

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल