LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मंत्री जारकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा दौरा 

निपाणी : निपाणी भागात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी  हे लवकरच निपाणी भागाचा दौरा करणार आहेत. भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर- पवार यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांची फेरनिवड होऊन शपथ घेतल्यानंतर भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर- पवार यांनी भेट घेतली व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी राजकीय चर्चा केली. 
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या यमकनमर्डी येथील त्यांच्या कार्यालयाला भेट देऊन कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी निपाणी तालुक्यातील विविध विषयावरही चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून कर्नाटक राज्यातील सर्व नागरिकांना वेगवेगळ्या योजनेतून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. पंच हमी गॅरंटी योजनेतून महिलांच्यासाठी व पदवीधर विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक योजना राबवून ते पूर्ण करण्यात येत आहेत. निपाणी तालुक्यात काँग्रेस पक्षाचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना राबवावे याबाबत मंत्री जारकीहोळी यांच्याशी राजेंद्र वडर- पवार यांनी चर्चा करून हितगुज साधला. मंत्री सतीश जारकीहोळी हे निपाणी, चिकोडी तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना निपाणी तालुक्यात आणखीन कोणत्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे बांधणी करावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नाइन इव्ही  हे आधुनिक वाहन राजेंद्र वडर पवार यांनी घेतले आहेत. प्रदूषण आणि इंधन वाचवण्याच्या दृष्टीने सदर वाहन उपयोगी ठरणार असून या नवीन घेतलेल्या वाहनातून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः बसून फेरफटका मारला. आणि ईव्ही नाईन या वाहनाचे कौतुक केले. याशिवाय भोज, बेडकीहाळ, गळतगा, अकोळ भागातील कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्ष याबद्दल सविस्तर चर्चा करून येत्या काही दिवसांमध्ये या भागात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वतः येऊन कार्यकर्त्यांची भेटण्याचे आश्वासन दिले. 
यावेळी राजेंद्र वडर पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल