LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव :  दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंच, या मराठी भाषा प्रेमी संघटनेकडून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव येथील  विद्यानिकेतनच्या सभागृहात रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

     या समारंभात बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील एकूण 45 गुणी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे .

     प्रत्येक विभागातील पहिल्या क्रमांकाला दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला चार हजार रुपये अशी एकूण एक लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय पाणी पुरवठा खात्याचे निवृत्त कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक हे सुध्दा निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांला गणित किंवा विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करणार आहेत.
   ‌‌ याशिवाय बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ज्या मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे ,अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचाही या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय एक उत्कृष्ट शाळा निवडून, त्या शाळेला 'महात्मा फुले आदर्श शाळा ' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
     यावर्षी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
     मी यश कसे साध्य केले ? या  सत्रात यशस्वी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला जाणार आहे. यानंतर ' दहावी नंतरच्या पाऊलवाटा' , यावर मुंबई येथील आय.आय.टी.चे प्रा.डॉ.गोपाळ पाटील,हे विद्यार्थी व पालकांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
   ‌‌ तेव्हा विद्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंच, यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल