LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

हे महालक्ष्मी देवी, लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्री कर ...!

समर्थकांनी घातलं सुळेभावीच्या महालक्ष्मीला साकडं ...!!

बेळगाव : हे महालक्ष्मी देवी, लक्ष्मी हेब्बाळकर यांना उपमुख्यमंत्री कर, असं साकडं हेब्बाळकर समर्थकांनी सुळेभावीचे जागृत ग्रामदैवत महालक्ष्मीला घातलं. यावेळी देवीची खनानारळाने ओटी भरून विशेष पूजा करण्यात आली.

राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांनी जागृत क्षेत्र सुळेभावीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरात विशेष पूजन करून मंत्री तथा बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर( Lakshmi Hebbalkar) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावे, अशी प्रार्थना केली.
यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. 

राज्यात स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची जबाबदारी मिळावी, यासाठी देवी महालक्ष्मीची विशेष पूजा करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघाच्या विकासासाठी अखंड परिश्रम घेणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लोकसेवा, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विचार करून त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळावे, अशी पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विशेष पूजनानंतर उपस्थितांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत लक्ष्मी हेब्बाळकर यांना उच्च पद मिळून राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी लाभो, अशी प्रार्थना केली. तसेच नव्या सरकारच्या माध्यमातून राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी गंगण्णा कल्लूर, देवण्णा हुंकरी पाटील, लक्ष्मीनारायण कल्लूर, दत्ता बांदीगणी, आडीवेश इटगी, नागेश देसाई, बसवराज म्यागोटी, नारायण लोकरे, आडीवेप्पा नागराळी, महादेव केशप्पण्णट्टी, तुळसाप्पा यरजरवी, संभाजी यमोजी, लक्ष्मण मांडू, रुद्रप्पा अमरापूर, महेश सुगण्णावर, सिद्धबसव मणतुर्गीमठ, नागय्या कुडचीमठ, प्रेम कोलकार, अप्सर जमादार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

#LakshmiHebbalkar
#sulebhavimahalaxmi

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुख्यमंत्रीपदी  डी. के. शिवकुमार,  कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्यजगातल्या लोकांवर आजही रामकथेची मोहिनी : सच्चिदानंद डॉ.शेवडे'पारस धर्म' संस्कार शिबीर उत्साहात : विद्यार्थ्यांचा शिबिराला मिळाला  उत्स्फूर्त प्रतिसादकौशल्य-आधारित शिक्षण घेणे आज काळाची गरज :  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभेत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले मतशिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान : शिवप्रेमींसाठी एक पर्वणीचडॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदबी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार आसिफ (राजू) सेठ यांची शाळांना भेट आसिफ सेठ म्हणाले, गुणात्मक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण करा '