LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!

बेळगाव : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात  सतीश जारकीहोळी यांचा अधिकृत समावेश करण्यात आला आहे. राजभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

सतीश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांच्या मातृजिल्हा बेळगावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

सतीश जारकीहोळी यांच्या शपथविधीची बातमी समोर येताच बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे जारकीहोळी समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. यावेळी समर्थकांनी  फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईचे वाटप केले. तसेच घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला.

समर्थकांनी सतीश जारकीहोळी यांच्या छायाचित्रांचे झेंडे हातात घेऊन “आमच्या नेत्याचा विजय असो”  तसेच “बेळगावच्या सावकारांना जय असो” अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता.
यावेळी मुस्ताक जमादार, सतीश यरगंबळीमठ, ज्योतिबा गुत्तेनवर, तेजस कोळणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुख्यमंत्रीपदी  डी. के. शिवकुमार,  कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्यजगातल्या लोकांवर आजही रामकथेची मोहिनी : सच्चिदानंद डॉ.शेवडे'पारस धर्म' संस्कार शिबीर उत्साहात : विद्यार्थ्यांचा शिबिराला मिळाला  उत्स्फूर्त प्रतिसादकौशल्य-आधारित शिक्षण घेणे आज काळाची गरज :  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभेत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले मतशिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान : शिवप्रेमींसाठी एक पर्वणीचडॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदबी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार आसिफ (राजू) सेठ यांची शाळांना भेट आसिफ सेठ म्हणाले, गुणात्मक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण करा '