LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' नवहिंद दिनदर्शिके" चे प्रकाशन समारंभपूर्वक

बेळगांव : नवहिंद सोसायटीच्या सन 2025 च्या ' नवहिंद दिनदर्शिके" चे प्रकाशन समारंभपूर्वक करण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, साहित्यीक गुणवंत पाटील उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश अष्टेकर होते.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. नवहिंद क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी आनंद पाटील यांनी ईशस्तवन सादर केले. संचालक मंडळाच्या वतीने पाहुण्यांना गुलाबपुष्प देण्यात आले.
यानंतर मालोजीराव अष्टेकर, गुणवंत पाटील, प्रकाश अष्टेकर, अनिल हुंदरे, सी. बी. पाटील, उदय जाधव, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, नारायण जाधव, माधुरी पाटील, निता जाधव यांच्या हस्ते "नवहिंद दिनदर्शिके" चे प्रकाशन करण्यात आले.


नवहिंद सोसायटीने सहकाराबरोबरच क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या नवहिंद संस्थेच्या उपक्रमाला समाजाने पाठबळ द्यावे असे आवाहन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी यावेळी बोलताना केले.
आपल्या कार्यकर्तृत्वाने सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठस्सा उमटवणारी संस्था म्हणजे नवहिंद सोसायटी असे गौरवोदगार साहित्यीक गुणवंत पाटील यांनी या प्रसंगी बोलताना काढले.
अध्यक्षिय भाषणात चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच सभासद आणि ग्राहकांची विश्वासार्हता हीच संस्थेचे पाठबळ असल्याचे म्हटले.


याप्रसंगी महेश जुवेकर, दत्ता उघाडे, दशरथ पाटील, वाय. एन. पाटील, पी. ए. पाटील, पी. एच. पाटील, आर वाय ठोंबरे, वाय. सी. गोरल, वाय. पी. देसूरकर, सुरेश पाटील, परशराम कंग्राळकर, पंकज जाधव, प्रमोद जाधव, अनिल घाडी, संतोष अष्टेकर, जनरल मॅनेजर एन,. डी. वेर्णेकर, वसूली विभाग प्रमुख जे. एस. नांदूरकर, एओ इन्चार्ज विवेक मोहिते, शाखाधिकारी मदन पाटील, दिनेश पाटील, संदिप बामणे, सोमेश चौगुले, सागर जाधव, रमाकांत देसाई, महातेंश अलगुंडी, निलेश नाईक, संगिता कणबरकर, राहूल पाटील, वर्षा बिर्जे, विजया माळगे, मंजूळा वड्डीण्णावर, रश्मी बडवे आदि उपस्थित होते.
संचालक उदय जाधव यांनी शेवटी आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम