LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली विविध विकास कामांना चालना

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदान संघाच्या आमदार आणि माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मतदार संघातील विविध विकास कामांना चालना दिली. 
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विविध गावांमध्ये रस्ते, गटारी, पूल तसेच धार्मिक इमारतींच्या बांधकामासह अनेक विकासकामांचे भूमिपूजन करून विकासकामांचा  शुभारंभ केला. याचबरोबर मंदिर बांधकामासाठी आर्थिक सहाय्याचा धनादेशही सुपूर्द केला.

त्यांनी सुमारे 1.12 कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात येणाऱ्या बडस गाव ते बिदरगड्डी दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले. 
तसेच  बेंडिगेरी गावात सुमारे 1.05 कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात येणाऱ्या  रस्ता आणि गटार बांधकामाचे भूमिपूजन त्यांनी केले. सदर कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या.

यानंतर  अरळीकट्टी गावात सुमारे 1 कोटी रुपयांच्या खर्चातून नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री बसवेश्वर मंदिराच्या इमारत बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचे 20 लाख रुपयांचा धनादेश लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, तोंटदार्य विरक्त मठाचे पूज्य शिवामूर्ती अज्जनवरू यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.
या कार्यक्रमात बोलताना तोंटदार्य विरक्त मठाचे पूज्य शिवामूर्ती अज्जनवरू यांनी,  हे मंदिर गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र बनण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीही महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे म्हटले.
यानंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसरीकट्टी, माविनकट्टी आणि होन्निहाळ या गावांना जोडणाऱ्या ब्रिज (बॉक्स कल्व्हर्ट) बांधकामाचे भूमिपूजन करून त्यांनी कामाला सुरुवात केली.
सुमारे 50 लाख रुपयांच्या खर्चातून हे काम हाती घेण्यात आले असून, पावसाळ्यातही गावांमधील संपर्क सुरळीत राहावा या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हे काम निश्चित मुदतीत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम