LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' करवे ' ला मोर्चा आधीच धास्ती ..! महामोर्चाला परवानगी न देण्याची केली मागणी ..!!

मोर्चाला परवानगी दिल्यास ' कन्नड स्वाभिमानी रॅली ' काढण्याचा करवे ने दिलाय ईशारा : जिल्हाध्यक्ष म्हणतोय, समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला ' 

बेळगाव : ' करवे ' ला मोर्चा आधीच धास्ती निर्माण झाली असून महाराष्ट्रएकीकरण समितीच्या महामोर्चाला परवानगी न देण्याची मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

कर्नाटक रक्षण वेदिकेचे (करवे) जिल्हाध्यक्ष दिपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 22 जून रोजी काढल्या जाणाऱ्या महामोर्चा रॅलीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. 

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती विविध ठिकाणी सभा घेऊन मराठी भाषिकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. 22 जून रोजी होणाऱ्या एमईएसच्या महामोर्चाला करवेचा तीव्र विरोध असून, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही कारणास्तव त्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करत, मोर्चाला परवानगी दिल्यास बेळगावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे करवे जिल्हाध्यक्ष दिपक गुडगनट्टी यांनी निवेदन देताना म्हटले आहे. 
पोटशूळ उठलेल्या आणि महामोर्चाच्या धास्तीने बिथरलेल्या जिल्हा ' करवे ' ने राज्यात महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेवर बंदी घालावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
 कन्नड भाषा, राज्यहित आणि प्रादेशिक एकात्मतेच्या विरोधात असलेल्या कोणत्याही हालचालींना प्रशासनाने वाव देऊ नये, असेही त्यानी निवेदनात नमूद केले आहे.
कन्नड सक्तीविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या म. ए. समिती नेत्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घ्यावे आणि त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनाने एमईएसच्या आंदोलनाला परवानगी दिल्यास, त्याच्या निषेधार्थ 22 जून रोजी “कन्नडवे सार्वभौम” या घोषवाक्यासह बेळगावात कन्नड स्वाभिमानी रॅली काढण्यात येईल, असा ईशारा दिपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखालील करवेने दिला आहे.
यावेळी राज्य संयोजक सुरेश गवन्नवर, होळेप्पा सुळदाळ, लगमण्णा माळंगी, अडवेप्पा तल्लुरी, सतीश गुडदवर, मंजुनाथ राठोड, लोकेश राठोड, अर्जुन कांबळे, इस्माईल मुल्ला, अभिषेक अगसगी, श्रीधर होळ्ळेनवर, गिरीश पाटील, रमेश यरगण्णवर, बसवराज दंडणवर, रूपा बारिगड्डी, संगीता कांबळे यांच्यासह करवेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
एसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटीलजिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू' करवे ' ला मोर्चा आधीच धास्ती ..! महामोर्चाला परवानगी न देण्याची केली मागणी ..!!मराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनमराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनआमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, कौटिल्य, लिंगराज यांचा सहज विजय होणार 'जेवणात आढळल्या अळ्या: संतप्त विद्यार्थ्यांनी छेडले रात्री उशिरापर्यंत आंदोलनकिट्टू रजपूत यांची कराटे बुडकॉन राज्य उपाध्यक्षपदी निवड : निवडीबद्दल होतंय कराटे क्षेत्रात कौतुकशांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षा