LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कळसा-भांडुरी नाला जोडणी : जिल्हाधिकाऱ्यांकरवी मुख्यमंत्र्यांना निवेदन

बेळगाव : कळसा-भांडुरी नाला जोडणी महिला आंदोलन महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी कळसा-भांडुरी नाला जोडणी प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांच्याकरावी मुख्यमंत्र्यांना निवेदन धाडले.



या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी कळसा -भांडुरीआंदोलनाच्या महिला गटाने निवेदनाद्वारे केली.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, अशाच प्रकारचे निवेदन महिला संघटनेच्या वतीने धारवाड हुबळी, बागलकोट, गदग या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तसेच कर्नाटकच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही हे निवेदन देऊन कळसा-भांडुरी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या दुसऱ्या भागात आम्ही केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत जाऊन ही निवेदने देऊन आम्हा नागरिकांची मागणी ही पिण्याच्या पाण्यासाठी असून उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्याचेही आम्ही पटवून देणार आहोत आणि यासाठी हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा अशी विनंती करणार आहोत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही आम्ही कळसा भांडुरी नाल्यातील पाणी उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पिण्याचे पाणी कमी असल्यामुळे या पाण्याची जरुरी असल्याचे सांगणार आहोत आणि आमच्या या प्रकल्पाला आपण विरोध करू नये अशी मागणीही आम्ही करणार आहोत.
वन खात्यातर्फे या भागात या प्रकल्पाचे काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट होतील असे म्हटले जात आहे. पण नाला जमिनीखालून असल्यामुळे नाल्याचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा झाले सहजपणे लावता येतील असेही सांगण्यात येणार आहे. हे आंदोलन आम्ही कळसा भांडुरा नाल्याची जोडणी होईपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी सांगितले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम