LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कलबुर्गी लिकर लायन्स संघ विजयी : बेळगाव ब्लास्टर संघ उपविजेता

कलबुर्गी लिकर लायन्स संघ विजयी : बेळगाव ब्लास्टर संघ उपविजेता


बेळगाव : बेळगाव लिकर मर्चंट संघटनेच्या वतीने जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत कलबुर्गी लिकर लायन्स संघाने विजेतेपद पटकाविले. तर बेळगाव ब्लास्टर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
सदर स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला होता. हुबळी धारवाड, कलबुर्गी, जमखंडी व बेळगाव मधून संघाने सहभाग दर्शविला होता. अंतिम सामन्यात कलबुर्गी लिकर लायन्स संघाने बेळगाव ब्लास्टर संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष गणेश हलगेकर, मुरलीधर जाधव, सतीश काबाडी, पुरस्कर्ते प्रणय शेट्टी, ऋतुराज भाटे आनंद चव्हाण, संजीव रानोरे, महांतेश पाटील, आकाश शेट्टी, फ्रान्सिस लोबो आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शहजाद पठाण व अनिल गवी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम