LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

देहदान करणाऱ्या कलाताईंनी समाजासमोर एक आदर्श ठेवला : प्रा. आनंद मेणसे

बेळगाव- " चळवळीत आपल्या पतीबरोबर काम करीत असतानाच या जगाचा निरोप घेताना आपल्या शरीराचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून देहदान करणाऱ्या कलाताईंनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच हे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल " असे विचार प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केले.
सौ. कला सातेरी यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भगतसिंग सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे हे होते.
प्रारंभी कला ताईंच्या प्रतिमेस बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व मीरा मादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी कै. सौ कला सातेरी यांना श्रद्धांजली वाहिली.
मराठा समाज सुधारणा मंडळ, पायोनियर अर्बन बँक व जायंट्स ग्रुपच्या वतीने शिवराज पाटील, पत्रकार संघाच्या वतीने कृष्णा शहापूरकर, सातेरी परिवाराच्या वतीने संजय सातेरी, मराठी वकील संघटनेच्या वतीने ऍड सतीश बांदिवडेकर, सार्वजनिक वाचनालय व घुमटमाळ मारुती मंदिर च्या वतीने अनंत लाड, येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने परशुराम मोटराचे, पत्रकार अनिल आजगावकर, माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने अनिल पाटील, मराठा मंडळाच्या वतीने रामचंद्र मोदगेकर, शिवलीला हिरेमठ, सभीना सावंत व मीरा मादार आदींनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी देहदानाचे महत्त्व सांगून आनंद मेणसे यांनी कला सातेरी यांच्या जीवनाचा आढावा घेताना. कला सातेरी यांनी महिला अन्याय निवारण समिती, भारतीय महिला फेडरेशन, अन्नपूर्णा महिला मंडळ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंगणवाडी महिला संघटना आदि संघटनांमध्ये कार्य केले आहे अशी माहिती यावेळी प्रा. आनंद मेणसे यांनी दिली. याप्रसंगी चळवळीतील अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती