LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

केपीसीसी अध्यक्षपदाबद्दल जारकीहोळी यांनी दिलं स्पष्टीकरण ...!

बेंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदी सतीश जारकीहोळी यांना आपली वर्णी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आणि काँग्रेस हायकमांडने बी. के. हरिप्रसाद यांची केपीसीसी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

मात्र हिरमोड झालेल्या सतीश जारकीहोळी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना,  केपीसीसी अध्यक्षपद माझ्या हातून निसटले असे नाही, तर त्याबाबतचा निर्णय आधीच स्पष्ट झाला होता, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या निकषानुसार सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केपीसीसी अध्यक्षपद मला मिळाले नाही, असे म्हणणे योग्य नाही. याबाबत दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट संकेत देण्यात आले होते, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले.
 आमच्या पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ हीच भूमिका कायम राहिली आहे. शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद निश्चित झाले आणि केपीसीसी अध्यक्षपदाबाबतची चर्चा थांबली. त्यामुळे आम्ही या विषयावर शांत राहिलो, असे ते म्हणाले.
 जारकीहोळी यांनी उदाहरण देताना सांगितले की, सिद्धरामय्या हे केपीसीसी अध्यक्ष नसतानाही मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्षपद असणे आवश्यक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 " मुख्यमंत्री होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष  असणे आवश्यक नाही " असे उदाहरणांसह सांगण्याचा हेतू मात्र न उमगणारा नाही. हो ना..! 
असो, हे राजकारण आहे आणि इथे काहीही घडू शकतं बरं का..!!

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार