LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

22 च्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चासाठी जांबोटीत समितीची जनजागृती मोहीम

खानापूर : येत्या 22 जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस) तर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या  ‘कन्नड सक्तीविरोधी मोर्चा 'च्या पार्श्वभूमीवर सीमाभागात तयारीला वेग आला आहे. या भव्य आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आज खानापूर तालुका समितीने जांबोटी परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 22 जून रोजी होणाऱ्या या मोर्चाच्या यशासाठी मंगळवार, 16 जून रोजी जांबोटी बाजारपेठ परिसरात खानापूर तालुका समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती पत्रकांचे वितरण करण्यात आले. सीमाभागातील मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या जनजागृती मोहिमेत माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बेळगांवकर, जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील तसेच डी. एम. भोसले गुरुजी यांच्यासह अनेक समिती कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांमध्ये मोर्चाबाबत जनजागृती करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल