LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' शिवम ' मध्ये माजी सैनिकांची गुंतवणूक...!

माजी सैनिक महासंघाने केलीय प्राधान्य देऊन  पैसे परत करण्याची मागणी

बेळगाव :  4500 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेले शिवानंद नीलण्णवर तसेच शिवम असोसिएट्स प्रकरण अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रकरणात गुंतवणूक केलेल्या माजी सैनिकांना प्राधान्याने त्यांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी माजी सैनिक संघटनांच्या महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पूजारी यांनी केली आहे.

अनेक माजी सैनिकांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून साठवलेली रक्कम शिवम असोसिएट्स या संस्थेत गुंतवली आहे. सुमारे 40 वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि विश्वासाने त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना लवकरात लवकर पैसे परत मिळावेत,” असे शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
“कोणी, किती आणि कोणत्या उद्देशाने गुंतवणूक केली याची सर्व माहिती तपासात पुढे येईल. मात्र, प्राथमिक टप्प्यात माजी सैनिकांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू करावी,” अशी मागणी माजी सैनिक संघटना महासंघाचे केली आहे.
 देशाच्या सीमांवर जीव धोक्यात घालून सेवा केलेले सैनिक निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासाठी साठवलेली रक्कम अशा संस्थांमध्ये गुंतवून अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
 जास्त नफ्याच्या आमिषाला बळी पडून खाजगी वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी, कायदेशीर आणि शासनमान्य बँकांमध्येच पैसे गुंतवावेत.” असे आवाहन यावेळी बोलताना महासंघाने नागरिकांना केले आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष जगदीश पूजारी, रमेश चौगला, शिवबसप्प काडण्णवर, महेश कम्मार, संतोष हिरेमठ, अशोक मजगी, रामचंद्र सुतार, बसवराज वन्नूर, बसप्प बरबळी आदी उपस्थित होते.

#exarmy 
#shivamscam 
#pressconference

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल