LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सायकलच्या चाकाला 'महागाईचा ब्रेक' :

 जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ :  स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत 

निपाणी : 
इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल चालविण्याचे महत्त्व आता सर्वांना कळू लागले आहे. त्यापासून वर शहर व परिसरात सायकल खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र सायकलच्या किंमतीत वाढ झाल्याने खिशाला कात्री लागत आहे.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सायकलच्या किमतीत चौथ्यांदा वाढ झाली आहे.
सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शाखेचे वाटप दरवर्षी होत असते. पण अद्याप यंदा सायकली बाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारी सह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‌काही पालक सायकल खरेदी करून देण्याचे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना आश्वासन दिले आहेत. मात्र ते पूर्ण करताना पालकांची कोंडी होत आहे. सायकलच्या किमती 500 ते 750 रुपयांनी वाढल्या आहेत. यापूर्वी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली होती. या दरवाढीचा सायकल व्यवसायावरही परिणाम दिसत आहे.
सायकलसाठी लागणारे प्लास्टिक, पेट, पेंट तयारकरण्यासाठी लागणारे केमिकल्स, स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी लागणारा कव्या माल, टायर यापैकी बऱ्याचशा वस्तू विदेशातून मागविल्या जातात.अमेरिका-इराणमधील युद्धामुळे कच्च्या मालाच्यादरात वाढ झाल्याने सायकलच्या किमतीही वाढल्या आहे. मजुरी आणि इंधनाचे दर वाढल्याने वाहतुकीचाही खर्च वाढला. त्याचाही परिणाम किमतीवर झाला आहे.
---
स्पेअरपार्ट बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत
सायकल तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या आपल्या देशात असल्या तरी लुधीयाना येथे खास स्पेअर पार्ट्स तयार करणाऱ्या लहान लहान कंपन्या आहेत. त्या सायकलसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स तयार करून लहान मोठ्या कंपन्यांना देतात. वेंडरला मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने सायकलच्या किमतीसुद्धा वाढत आहेत. स्पेअर पार्ट्स बनविणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल अपुरा मिळत असल्याने लहान कंपन्या अडचणीत आल्या आहेत. 
----

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार