LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावात आधार सेवा केंद्राचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन

बेळगाव : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) वतीने बेळगावात आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या आधार सेवा केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या(UIDAI) च्या उपसंचालिका सिरी आनंद व्ही. उपस्थित होत्या.

कार्यक्रमात बोलताना सिरी आनंद व्ही. यांनी,  आधार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध सेवांची माहिती दिली. तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या(UIDAI)  चे व्यवस्थापक मोहम्मद मुसाब यांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग प्रक्रिया आणि नव्या आधार ॲपची वैशिष्ट्ये याबाबत सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या ( UIDAI ) कडून राबविण्यात येत असलेल्या नागरिकाभिमुख सेवा उपक्रमांचे कौतुक केले. सार्वजनिक तक्रारींचे त्वरित निराकरण आणि दर्जेदार सेवा पुरविणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच आधार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध सुविधा आणि सेवांबाबत जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आधार बायोमेट्रिक माहितीचे प्रत्यक्ष अद्ययावतीकरण करण्यात आले. तसेच आधार नोंदणी आणि अद्ययावत प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
यावेळी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या( UIDAI) च्या उपसंचालिका सिरी आनंद व्ही., व्यवस्थापक मोहम्मद मुसाब, क्लस्टर व्यवस्थापक श्याम सुंदर, BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आधार सेवा केंद्र व्यवस्थापिका स्वाती कोटबागी, जिल्हा आधार सल्लागार विनोद तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल