LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्रामाणिक अभ्यास हेच यशाचे गमक  : महापौर प्रीती कामकर

बेळगाव : विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर आपले शैक्षणिक जीवन यशस्वी करावे, असे आवाहन महापालिकेच्या महापौर प्रीती कामकर यांनी केले.

प्रामाणिक अभ्यास हेच यशाचे गमक  असल्याचेही कामकर म्हणाल्या.

शहरातील खासबाग उप्पार गल्ली येथील बनशंकरी मंदिरात देवांग समाज ट्रस्ट आणि गायत्री सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने  आयोजित एसएसएलसी आणि पीयूसीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेल्या गुणी विद्यार्थ्यांच्या  सत्कार समारंभाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या आकर्षणाला बळी न पडता चांगले वर्तन, शिस्त, तसेच गुरुजन आणि ज्येष्ठांचा आदर करण्याचे संस्कार अंगीकारावेत, असे सांगितले.
समारंभात मान्यवरांच्या हस्ते एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कृष्णा नदीकाठी मगर ..! तरुणाचा दरीतील पाण्यात बुडून मृत्यू : मौज मजेसाठी गेला होता मित्रांसोबत ..!ज्ञानमंदिरात घाण : विकृत मनोवृत्तीने केले शिक्षकी पेशाला  बदनाम ...!मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहनजागतिक रक्तदाता दिनानिमित्त बेळगावात मेगा रक्तदान शिबिर व जनजागृती रॅली : के. एन. शिवकुमार म्हणाले, ' रक्तदान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारीप्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ..!एमएलआयआरसीच्या “योग फॉर हेल्दी एजिंग” ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसादऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी  विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणीह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने दिलाय उपोषणाचा इशारा : केली आहे लोकमागण्यांच्या पुर्ततेची मागणीसरसंघचालक आणि प्रियांक खर्गे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी : प्रियांक खर्गे यांनी केलाय प्रश्नांचा भडिमार ; सरसंघचालकांनीही केलाय शाब्दिक पलटवार ..!