LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बोगस डॉक्टरांना आरोग्य विभागाचा दे धक्का ....!

चिक्कोडी : ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी बऱ्यापैकी आपले बस्तान बसविले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांना जिल्हा आरोग्य विभागाने दमदार धक्का दिला आहे.


जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. ईश्वर गडाद यांच्या नेतृत्वाखाली सात पथकांनी गावातील रुग्णालये आणि दवाखान्यांवर एकाच वेळी छापे टाकून तेथील कागदपत्रे, औषधे आणि उपचार पद्धतींची तपासणी केली. यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.


उपायुक्तांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग, KPME, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल विभाग आणि पोलिसांचा समावेश असलेल्या सात पथकांनी दिवसभर रुग्णालयांची पाहणी केली. औषधांचा साठा, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, रुग्णालयांचे परवाने यांची सखोल चौकशी करण्यात आली.


तपासणीदरम्यान काहीजणांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसतानाही दवाखाने थाटल्याचे निदर्शनास आले. पथके येत असल्याची माहिती मिळताच काही तथाकथित डॉक्टरांनी रुग्णालये सोडून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.


चिक्कोडी तालुक्यातील करोशी येथील एका रुग्णालयांवर या पथकाने छापा टाकून पाहणी केली. तपास पूर्ण झाला असून अहवाल जिल्हा समितीकडे पाठवला जाईल. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,” असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गडाद यांनी सांगितले आहे.


वैद्यकीय शिक्षण नसताना बेळगाव तालुक्यातही अनेक बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटल्याची माहिती उपलब्ध आहे. विना परवाना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अशा डॉक्टरांचा शोध घेऊन आरोग्य विभागाने त्यांच्यावर उपचार करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम