LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीस हिरवा कंदील

बेळगाव : शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अतिथी शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेस तात्काळ हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी ही एक सुखद बातमी आहे.

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 1,349 अतिथी शिक्षकांची नियुक्ती तर माध्यमिक शाळांमध्ये  263 अतिथी शिक्षकांची नियुक्ती झाली असून 570 शिक्षकांची आवश्यकता आहे.
सरकारी प्राथमिक शाळांमध्ये आणखीन 130 पदांची तर माध्यमिक शाळांमध्ये  आणखीन 708 शिक्षकांची गरज आहे.  

जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षक पदे अद्याप रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.
बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकूण 5,387 शिक्षक पदे रिक्त आहेत. यापूर्वी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एक-दोन महिन्यांनी अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली जात होती. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार अध्यापन व अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, 2026-27 शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्याध्यापकांवर नियुक्तीची जबाबदारी :
अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. अध्यापन क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक अतिथी शिक्षकांनी कामकाजाला सुरुवात केली आहे, अशी माहिती चिक्कोडीचे डीडीपीआय आर. एस. सीताराम यांनी दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील स्थिती : 
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 1,919 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यापैकी 1,349 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून आणखी 570 शिक्षकांची आवश्यकता आहे.
माध्यमिक शाळांमधील 393 रिक्त पदांपैकी 263 अतिथी शिक्षकांची नियुक्ती झाली असून उर्वरित 130 पदांसाठी मागणी शासनाकडे पाठविण्यात आली आहे.
चिक्कोडी जिल्ह्यातील स्थिती
चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 2,529 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यापैकी 1,821 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून आणखी 708 शिक्षकांची गरज आहे.
माध्यमिक शाळांमधील 546 रिक्त पदांपैकी 506 पदे भरली गेली आहेत. उर्वरित 40 शिक्षकांची नियुक्ती अद्याप बाकी आहे. तसेच याच शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू झालेल्या सरकारी माध्यमिक शाळांसाठी 262 अतिरिक्त अतिथी शिक्षकांची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने सरकारला कळविले आहे.
शिक्षकांची कायमस्वरूपी भरती रखडलेली असली तरी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अतिथी शिक्षकांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST