LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभ

बेळगाव :  उद्यगबाग येथील जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (JCER) येथे 6 जून रोजी पदवीदान समारंभ व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालक डॉ. एस. व्ही. गोरबाळ यांनी दिली आहे.
महाविद्यालयाच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, हा प्रतिष्ठित समारंभ 6 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. प्रसाद रामपुरे  तसेच एशियन नेट न्यूज डॉट कॉमचे मुख्य संपादक अजित हनमक्कनवर उपस्थित राहणार आहेत.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ संलग्न असलेल्या या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांना यापूर्वीच एनबीएची मान्यता प्राप्त झाली आहे. चालू शैक्षणिक वर्षात विविध शाखांमधून यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या एकूण 260 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या समारंभात अधिकृतपणे पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी होणाऱ्या या पदवीदान समारंभात संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला डॉ. प्रकाश सोनवळकर, निवृत्त कर्नल जानी आणि डॉ. ज्योती बी. आर. उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार