LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डॉ. मेधा दुभाषी यांची सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट

बेळगाव : पुणे येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या संस्थेमधील प्राध्यापिका डॉक्टर मेधा दुभाषी यांनी सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी जेष्ठ संचालक श्री अभय याळगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक प्रसन्न हेरेकर आणि व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर यावेळी उपस्थित होते .
डॉक्टर दुभाषी यांनी बेळगावातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी त्यांचे वडील पी. आर. दुभाषी हे बेळगावचे कमिशनर असताना त्यांचे एक व्याख्यान बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेमध्ये त्यांनी गुंफले होते. त्यांचे वाचनालयाशी घनिष्ठ संबंध होते. त्यावेळेला मेधा दुभाषी याही वडिलांसमवेत वाचनालयाला यायच्या. मेधा दुभाषी या सध्या जागतिक पातळीवर महिला सक्षमीकरणाचे कार्य करतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भाग घेऊन आपले शोधनिबंध सादर केले आहेत. देशातील विविध संस्थांमधील महिला व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास करून त्यांनी मौलिक निष्कर्ष काढले आहेत. याप्रसंगी कार्यवाह सौ सुनीता मोहिते यांनी त्यांचे आभार मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम