LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

22 पासून शिंदोळी महालक्ष्मी यात्रोत्सव : 30 पर्यंत चालणार यात्रा !

बेळगाव : 22 एप्रिल पासून शिंदोळी गावची महालक्ष्मी यात्रा भरविण्यात येणार आहे अशी माहिती शिंदोळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर यांनी दिली आहे. परमपूज्य श्री नागेंद्र महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा यात्रा महोत्सव संपन्न होणार असल्याचेही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.



22 एप्रिल पासून सुरू होणारी ही यात्रा 30 एप्रिल पर्यंत चालणार आहे.. श्री महालक्ष्मी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसनाई देवी यांची ही यात्रा तब्बल 14 वर्षानंतर होत आहे.
दिनांक 23 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी गावातून श्री महालक्ष्मी देवीची सवाद्य रथ यात्रा काढली जाणार आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या कारंजी मठाचे श्री गुरु सिद्धमास्वामीजी तसेच हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत.
24 एप्रिल रोजी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर उपस्थित राहणार आहेत. यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.



यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शिंदोळी ग्रामपंचायत, गावातील संघ संस्था, पंचमंडळ आणि युवक व महिला मंडळे विशेष प्रयत्नशील आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती