कागवाड : कागवाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्री पार्वती बाळासाहेब पाटील (वय 94 ) यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी दुपारी कागवाड मतदारसंघातील सिन्नाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधीला विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पार्वती पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून माजी मंत्री श्रीमंत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत पार्वती पाटील यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 8 जून रोजी सिन्नाळ येथे होणार आहे.
#kagwad
#ShrimantPatil
#exminister